Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: ‘मोहब्बतें’ (Mohabbatein Movie) सिनेमातील अभिनेता जुगल हंसराज (Jugal Hansraj) तुम्हाला नक्कीच आठवत असेल. ज्यानं आपल्या आकर्षक निळ्याशार डोळ्यांनी कित्येक तरुणींना घायाळ केलेलं. अभिनेता जुगल हंसराज यानं फारशा सिनेमांमध्ये काम केलं नसलं तरी, आपल्या ‘चॉकलेट बॉय’ इमेजमुळे त्यानं आपल्या कित्येक चाहत्यांच्या हृदयात आपलं एक खास स्थान निर्माण केलेलं. सध्या सोशल मीडियावर जुगल हंसराजचा लहानपणीचा एक फोटो व्हायरल होतोय, ज्यामध्ये तो बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा (Actress Rekha) हिच्यासोबत दिसतोय. या फोटोमध्ये जुगल खूपच लहान आणि गोंडस दिसतोय.
जुगल हंसराज हा एक असा बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) आहे, ज्यानं केवळ आपल्या अभिनयानंच नव्हे, तर आपल्या हास्यानं आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वानंही चाहत्यांना भूरळ घातलीय. एकेकाळी त्याला ‘नॅशनल क्रश’ मानलं जायचं आणि तो बड्या स्टार्सना टक्कर देईल असं वाटत होतं, मात्र, असं असूनही त्याला दीर्घकालीन यश मिळालं नाही आणि लवकरच तो बॉलिवूडच्या झगमगाटातून मागे पडला.
View this post on Instagram
रेखासोबत दिसणारा सुपरस्टार कधीकाळी होता अनेकांच्या गळ्यातील ताईत (Mohabbatein Movie Actor Jugal Hansraj)
अभिनेता जुगल हंसराजचा रेखासोबतचा बालपणीचा एक फोटो समोर आला होता आणि त्याला खूप पसंती मिळालेली. सोशल मीडियावर या दोघांचे अनेक फोटो उपलब्ध आहेत, ज्यावरून जुगल हंसराज आणि रेखा यांच्यातील घट्ट नातं दिसून येतेय. सध्या व्हायरल होत असलेला फोटोही अत्यंत मनमोहक आहे. या फोटोमध्ये रेखा जुगल हंसराजला प्रेमानं मिठी मारताना आणि खूप आनंदी दिसतेय, तर जुगलही तिच्याकडे पाहून स्मितहास्य करतोय. हा सुंदर फोटो नक्कीच तुमची मन जिंकेल. अनेक चाहत्यांनीही या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलेला.

लहानपणापासूनच करतोय फिल्म्समध्ये काम (Who Is Actor Jugal Hansraj?)
जुगल हंसराज याला लहानपणापासूनच अभिनयात आपलं नशीब आजमवायचं होतं. त्यानं कित्येक फिल्म्समध्ये चाईल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलेलं. दरम्यान, एक वेळ अशी होती, जेव्हा जुगल हंसराज याच्या क्युटनेसवर शाहरुख, सलमान आणि आमिर खान पेक्षाही जास्त तरुणी फिदा होत्या. सध्या जुगल हंसराज फिल्म्सपासून पूर्णपणे दूर आहेत. सध्या ते अमेरिकेत सेटल्ड झालेत. जुगल हंसराज आपली पत्नी जास्मिन आणि मुलासोबत अमेरिकेत राहतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Source: Read Full Article
Leave a Reply